शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची दुसरी मोठी यादी प्रसिद्ध; पाहा संपूर्ण आकडेवारी

अखेरीस राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे, कारण या कर्जमाफीअंतर्गत अडकलेली गाडी काही का होईना आता पुढे सरकली आहे. या कर्जमाफीची बहुप्रतीक्षित असणारी तिसरी यादी आज अखेर म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रकाशित झालेली आहे. आपण या संदर्भात दुपारीच व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या आहेत; तिसरी यादी आली आहे. तेव्हा अनेकांनी त्याखाली कमेंट्सदेखील केल्या की, “यादी आलेली नाही, चुकीची माहिती देऊ नका.” परंतु शेतकरी मित्रांनो, आपण कधीही चुकीची माहिती देत नाही. आपण सांगितलं होतं की कर्जमाफीच्या याद्या आलेल्या आहेत आणि त्यानुसारच आता आपल्या राज्याच्या सहकारमंत्र्यांनी स्वतः याबाबतची स्पष्ट माहिती दिलेली आहे. त्यानुसार कर्जमाफीची ही यादी आलेलीच असून यामध्ये राज्यातील ३,५५,६१४ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Shetkari Karjmafi New GR: वनपट्टाधारक, मयत शेतकरी व वृद्धांच्या खात्यावरील कर्ज माफ होणार; शासनाचा मोठा निर्णय!

मग आता नक्की हे ३,५५,६१४ शेतकरी कोण आहेत? हे दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी आहेत का? की दोन लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले शेतकरी आहेत? किंवा हे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरलेले शेतकरी आहेत का? असे विविध प्रश्न या निमित्ताने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहेत. तर चला, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्याआधी पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या योजने संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील.

तर शेतकरी मित्रांनो, आधी आपल्या सहकारमंत्र्यांनी काय सांगितलं आहे ते पाहूया. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ३,५५,६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर.” आता तुम्ही म्हणाल की, “तुम्ही तिसरी यादी सांगत आहात आणि हे दुसरी यादी म्हणत आहेत?” तर लक्षात घ्या, २२-२३ जुलै रोजी पहिली यादी जी ६०० शेतकऱ्यांची आली होती, तिला आपण पहिली यादी धरत आहोत. पण ठीक आहे, शासनाने सांगितल्याप्रमाणे ही अधिकृत दुसरी यादी असून या यादीमध्ये ३,५५,६१४ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

रब्बी बियाणे अनुदान अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज |Rabbi Seed Subsidy 2026

यामध्ये पुढे काय म्हटलं आहे तर, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी दुसरी यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत एकूण ३,५५,६१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.”

आता लक्षात घ्या, राज्यातील पहिल्या यादीनंतर जवळपास १७ लाख शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. आता त्यामध्ये साडेतीन लाखांची भर पडल्याने राज्यातील सुमारे २० लाख शेतकरी आतापर्यंत या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे नियोजन आहे. या संदर्भात आपण पाहिले की, आमदार रोहित पवार यांनी कालच मागणी केली होती की १५ दिवसांच्या आत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करा. आतापर्यंत केवळ १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाली आहे, कारण पहिल्या यादीतील अजूनही ४ लाख शेतकऱ्यांना पैसे मिळणे बाकी आहे; तोवर सरकारने पुढच्या ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

आता या यादीत कोण शेतकरी आहेत? तर हेदेखील तेच शेतकरी आहेत ज्यांचे २ लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी कर्ज आहे. ज्यांच्यावर २ लाखांपेक्षा कमी कर्ज आहे, केवळ त्याच शेतकऱ्यांची ही यादी असणार आहे.

आता ही यादी तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? तर ही यादी तुम्हाला तुमच्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये पाहायला मिळेल. तसेच ही यादी तुम्हाला संबंधित बँकांमध्ये, विकास सोसायटीमध्ये आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये देखील पाहायला मिळू शकते. त्यामुळे विविध ठिकाणांवरून तुम्ही ही यादी पाहू शकता. यादीमध्ये आपले नाव असल्यास तुम्हाला आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा पद्धतीने ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पडत आहे.

कर्जमाफीच्या बदल्यात ‘नमो शेतकरी’ बंद होणार? जाणून घ्या व्हायरल दाव्यातले सत्य आणि रखडलेल्या हप्त्यांचे गणित

थोडक्यात सांगायचे तर, आतापर्यंत २० लाख शेतकऱ्यांची नावे याद्यांमध्ये जाहीर झाली आहेत. त्यातील १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली असून, आजच्या यादीतील शेतकऱ्यांसह अजूनही जवळपास ८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. तसेच ५६ लाखांपैकी २० लाख वगळता उर्वरित ३६ लाख शेतकरी अजूनही याद्यांमध्ये नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालू आहे आणि या प्रक्रियेला गती देण्याची मोठी आवश्यकता आहे; कारण सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत.

एकतर ज्यांनी नियमित कर्ज फेडले आहे, त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या निर्णयाबाबत अजूनही संभ्रम आहे. २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांविषयी तर अद्याप कोणतीही स्पष्ट तरतूद किंवा अपडेट शासनाकडून आलेली नाही. आधी १७ लाखांनंतर १४ लाख शेतकऱ्यांची यादी येईल असे कृषिमंत्र्यांनी सांगितले होते; परंतु प्रत्यक्षात यादी केवळ ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांचीच आली आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेला खरोखरच खूप विलंब होत असून, सर्व शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळेपर्यंत २०२७ उजाडणार की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

तुम्हाला याबाबत काय वाटते, ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असूनही तुमचे नाव यादीत आले नाही का? हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमचे प्रश्न, शंका आणि मते कमेंटमध्ये मांडायला विसरू नका.

यह भी पढ़ें

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची दुसरी मोठी यादी प्रसिद्ध; पाहा संपूर्ण आकडेवारी

Shetkari Karjmafi New GR: वनपट्टाधारक, मयत शेतकरी व वृद्धांच्या खात्यावरील कर्ज माफ होणार; शासनाचा मोठा निर्णय!

रब्बी बियाणे अनुदान अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज |Rabbi Seed Subsidy 2026

कर्जमाफीच्या बदल्यात ‘नमो शेतकरी’ बंद होणार? जाणून घ्या व्हायरल दाव्यातले सत्य आणि रखडलेल्या हप्त्यांचे गणित

Leave a Comment